तळमावले/वार्ताहर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ला शुभसंदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. या तीनही मान्यवरांनी स्पंदन ट्रस्टच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड जाहीर झालेल्या पुरस्कार्थींना आणि ‘महाराष्ट्रातील माणिकमोती’ या पुस्तकाच्या प्रकाशनास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आणि इंटरनेटच्या युगात पत्रलेखन कला दुर्मिळ होत आहे. ही पत्रे भविष्यात सामाजिक कार्य करण्यासाठी ऊर्जा देतील अशी प्राजंळ भावना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी हे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमांना समाजातून नेहमी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला सन 2014 पासून संदीप डाकवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्रभर काम करुन राबवलेल्या उपक्रमांचा एकप्रकारे सन्मान झाला आहे. काही दिवसापूर्वीच सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम यांनी स्पंदन गौरव गीत प्रदर्शित केले आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार, सेवाव्रती पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001ः 2015 मानांकन प्राप्त मिळाल्यामुळे ट्रस्ट च्या कर्तृत्वावर गुणवत्तेची आणि दर्जाची मोहोर उमटली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचेकडून ‘स्पंदन’ला शुभेच्छा
RELATED ARTICLES