Monday, October 13, 2025
घरमहाराष्ट्रज्येष्ठ लेप्रोस्कोपिक सर्जन श्री.नितीन शहा यांचे " पद्म" पुरस्कारसाठी नामांकन दाखल

ज्येष्ठ लेप्रोस्कोपिक सर्जन श्री.नितीन शहा यांचे ” पद्म” पुरस्कारसाठी नामांकन दाखल

मुंबई (मोहन कदम) : व्हिजन इंडिया समूह द्वारा डॉ.नितीन शहा यांचा यावर्षीच्या “पद्म” पुरस्कारसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.२६ हजाराहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात अविरत कार्य करण्यारे ज्येष्ठ लेप्रोस्कोपिक सर्जन श्री.नितीन शहा यांचा व्हिजन इंडिया समूह द्वारे यावर्षीच्या पद्म पुरस्कारसाठी नामांकन दाखल करण्यात आले.भारत गणतंत्र प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेत मंत्रीमंडळ द्वारे सूचित व्यक्तीविशेषांचा महामहीम राष्ट्रपती यांच्या द्वारे पद्म अलंकरणाने विशेष सन्मान केला जातो.यासाठी दूरस्थ माध्यमाद्वारे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सरकार द्वारा आवाहन करण्यात आले होते.श्रीमती सायली सावंत यांच्या शिफारशीनुसार संस्था सल्लागार ज्येष्ठ समाजसेवक मंगेश रासम यांच्या परिश्रमातून डॉ.नितीन शहा यांचे नामांकन दाखल करण्यात आले.याचे औचित्य साधत संस्था संस्थापक अध्यक्ष स्वप्निल राणि नंदकुमार यांनी डॉ नितीन शहा यांचा विशेष सन्मान करत,डॉ नितीन शहा यांचे सातत्यपूर्ण वैद्यकीय योगदान तसेच परिश्रम उचित माध्यमांद्वारे समाजासमोर आले पाहिजे असे प्रतिपादन या समारंभ प्रसंगी व्यक्त केले.श्रीमती रासम, श्री.सुनील सावंत,श्री जिग्नेश शहा यावेळेस विशेष उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments