मुंबई, ता. 28
प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा दक्षिण – मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रभादेवीच्या सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी सिद्धिविनायकाच्या आरतीमध्ये देखील ते सहभागी झाले.
कोट
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि संकष्टी चतुर्थी या शुभमुहूर्तावर महायुतीचा उमेदवार म्हणून संधी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. दक्षिण – मध्य मुंबईवर शिवसेनेचा भगवा कायम फडकत रहावा, ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद मला लाभेल, असा मला विश्वास आहे.