Monday, October 13, 2025
घरमहाराष्ट्रपिंपळपानावर रेखाटली अमिताभ बच्चन यांची कलाकृती

पिंपळपानावर रेखाटली अमिताभ बच्चन यांची कलाकृती

प्रतिनिधी : बाॅलीवूडचे शहनेशाह, महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम अर्थात ‘बिग बी’ म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन. यांचा दि.11 ऑक्टोंबर, 2025 रोजी 83 वा वाढदिवस येत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतीमित्र संदीप डाकवे यांनी ‘जंजीर’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची पिंपळपानावर सुंदर कलाकृती साकारली आहे. हे अनोखे चित्र तयार करुन त्यांनी अमिताभ यांना चित्रमय शुभेच्छा दिल्या आहेत. या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
विविध माध्यमातून कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या संदीप डाकवे यांनी पिंपळपानाचा नको असणारा भाग कापून अमिताभ यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पिंपळाचे पान, पेन्सिल, ऑपेरेशन ब्लेड, इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी संदीप डाकवे यांनी अमिताभ यांना ठिपक्यातून रेखाटलेले चित्र पोस्टाने पाठवले होते. या चित्राची दखल घेत अमिताभ यांनी स्वतः स्वाक्षरी करुन एक सुंदर पत्र डाॅ.डाकवे यांना पाठवले होते. याशिवाय अमिताभ यांच्या प्रसिध्द चित्रपटातील डायलाॅगमधून चित्र चित्र रेखाटले होते.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद ‘‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’’, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतली आहे.
संदीप डाकवे यांनी यापूर्वी गौतम बुध्द, आण्णा भाऊ साठे, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पिंपळपानावर अप्रतिम चित्रे रेखाटली आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments