Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रवक्तृत्व व कथाकथन स्पर्धांसाठी श्री ज्योतिर्लिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

वक्तृत्व व कथाकथन स्पर्धांसाठी श्री ज्योतिर्लिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कराड(अमोल पाटील) : सध्या ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात होत असलेले परिवर्तन उल्लेखनीय आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ गुणवत्तेतच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासाच्या विविध पैलूंमध्येही चमकताना दिसत आहेत, ही आनंदाची बाब आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २०२६ मध्ये ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध, कथाकथन, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या स्पर्धांच्या केंद्रस्तरीय फेरीत यश मिळवून श्री ज्योतिर्लिंग विद्यालय, जिंती (ता. कराड) येथील विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी गटात कु. श्रावणी मोहन बागल (इयत्ता आठवी) हिने तालुकास्तरावर तृतीय क्रमांक, तर नववी ते बारावी गटात कु. सई वैभव पाटील हिनेही तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

कथाकथन स्पर्धेत नववी ते बारावी गटात कु. आर्या शहाजी देसाई (इयत्ता नववी) हिने द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. आनंदराव (राजाभाऊ) पाटील व उपाध्यक्ष श्री शंकर (आण्णा) पाटील यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन जिंतीचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थिनींचा गौरव केला.

श्री ज्योतिर्लिंग विद्यालय, जिंती येथील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यशासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments