प्रतिनिधी — एल. एस. जी. डी. आणि एल. जी. एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुध्दा मिळणाऱ्या वेतनवाढी बंद करण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा बेकायदेशीर निर्णय रद्द करा
तसेच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा या मागण्यांसाठी, मुंबई महानगर पालिकेचे संबंधित सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी हे गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेणार आहेत.या मोर्चावर काही कारणास्तव प्रशासनाने बंदी आणली होती.आता हा इशारा मोर्चा गुरुवारी १०० % पालिकेवर सकाळी सकाळीच धडकणारच आहे,असे युनियनचे नेते रमाकांत बने यांनी स्पष्ट केले आहे.
हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर गेल्यावर तेथे आयुक्तांना भेटून निवेदन सादर करण्यात येणार आहे. या भेटीच्या वेळी उचित निर्णय न झाल्यास, मोर्चानंतरच्या सभेमध्ये या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुढील प्रखर आंदोलनाची घोषणा करण्यात येईल असे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.
या अनुषंगाने शुक्रवारी २६ सप्टेंबर प्रा.सुरेंद्र गावस्कर सभागृह,दादर पूर्व येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेस युनियनचे अध्यक्ष शशांक राव,उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.याच सभेत कामगार कर्मचाऱ्याच्या मागण्यांची तड लावण्यासाठी महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पालिका मुख्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा १६ ऑक्टोबरला धडकणार
RELATED ARTICLES