प्रतिनिधी : अस्मानी संकटामुळे पुराच्या पाण्यात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना “फुल ना फुलांची पाकळी” म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मनसेच्या सरचिटणीस सौ. स्नेहल सुधीर जाधव यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मनसेने “म- मदत, न- नव्हे, से- सेवा” या भावनेतून ही मदत दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले. “जगाचा पोशिंदा जगला तर आपले अस्तित्व टिकेल” या विचाराने प्रेरित होऊन ही कृती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील शेतकरी मोठ्या संकटातून जात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.