मुंबई : वडाळा विधानसभा क्षेत्रातील शिवडी कोळीवाडा येथील “स्टार मित्र मंडळ (रजि.)” यांच्या वतीने कोळीवाडा समाज हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी परळ येथील नौरोजी वाडिया रुग्णालय रक्तपेढी यांचे विशेष सहकार्य लाभले.या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव श्री. सुधीरभाऊ साळवी, स्थानिक माजी नगरसेवक श्री. सचिनभाऊ पडवळ, माजी नगरसेवक श्री. मुकुंद पड्याळ, वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे, युवासेना शाखाधिकारी रोहन सुरेश काळे, तसेच शिवडी कोळीवाडा उपशाखाप्रमुख श्री. सुधीर पाटील उपस्थित होते.स्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष पवार, सचिव श्री. नरेंद्र धाडवे, खजिनदार श्री. संदीप घोलप व मंडळाचे सर्व कार्य
कर्ते यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. या शिबिरात एकूण ५७ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदाते व आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.