नवी मुंबई : विनर्स कराटे असोसिएशन व सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, कोपर खैरणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. उलवे, नवी मुंबई येथे झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सुमारे १२०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
कोपर खैरणे (सेक्टर ८) येथील प्रशिक्षण केंद्रातील विजेत्यांमध्ये : आराध्य जांभळे याने काटा आणि कुमिते या दोन्ही प्रकारात दुहेरी सुवर्णपदक पटकावले,आयुष शिंदे याने काटा आणि कुमिते प्रकारात दुहेरी रौप्यपदक मिळवले, प्रियांश येळवे याने काटा प्रकारात कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
विजेत्या विद्यार्थ्यांचा धगगती मुंबई न्यूजचे संपादक श्री. भिमराव धुळप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शारदा विद्या मंदिर शाळेचे संस्थापक व विनर्स कराटे असोसिएशनचे सल्लागार श्री. रमेश संकपाळ सर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक श्री. अंकित संकपाळ सर यांनी सांगितले की, “सर्व खेळाडू अत्यंत मेहनती असून प्रशिक्षणादरम्यान ते आपल्या १०० टक्के क्षमतेने प्रयत्न करून यशाच्या शिखरावर पोहोचण्याची जिद्द दाखवतात.”
विनर्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संतोष पवार सर आणि सचिव श्री. किशोर इथापे सर यांनीही सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.