मेढा(अजित जगताप ) : संपूर्ण महाराष्ट्रात विशेषता नवी मुंबई या ठिकाणी कोणताही राजकीय वारसा नसतानाही ध्रुव बाळासारखे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे शिवसेना युवा नेते अंकुश कदम यांची महाराष्ट्र राज्यातील महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी व जावळीचे सुपुत्र यांना न्याय मिळणार असल्याने जावळीत पुन्हा एकदा धनुष्यबाण इतिहास घडवणार आहे. त्या दृष्टीने राजकीय खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. असे भाकीत वर्तवले जात आहे.
जावळी तालुक्यातील दुर्गम असलेल्या मालचौंडी या छोट्याशा गावातील श्री अंकुश कदम यांनी आपले वकृत्व व कर्तव्याने खूप मोठी मजल मारली आहे. नवी मुंबई सारख्या ठिकाणी ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, खारघर, कामोठे ,पनवेल आधी परिसरात त्यांनी विकास कामातून चांगला ठसा उमटवला आहे. जावळीचे राजकारण त्या अर्थाने ठाणे व मुंबई, नवी मुंबई या ठिकाणाहून होत आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत नवी मुंबईला मेळावा घेतल्याशिवाय इच्छुक उमेदवारांनाही प्रचार झाल्याचे वाटत नाही. अशा वेळेला हुकमी एक्का म्हणून शिवसेनेकडे आता युवा नेते श्री अंकुश कदम यांच्यासारखा मोहरा हाती लागलेला आहे.
नवी मुंबई मध्ये घराणेशाही विरोधात त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने विधानसभेमध्ये निवडणूक लढवली होती. चांगल्या पद्धतीने त्यांना मतदारांनी ही स्वीकारले होते. सध्या त्यांनी शिवसेनेत आदरणीय एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. शिवसेना नवी मुंबई संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर मराठा युवा सेनेचे अध्यक्ष पद ते खंबीरपणाने भूषवत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन समाजकारण करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे विशेषतः युवा पिढीला करियर मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि इतर मनोरंजन व स्पर्धात्मक कार्यक्रमात ते तन-मन धनाने झटतात.
जावळीतील अनेक मान्यवर त्यांच्याकडे आपुलकीने पाहतात. लोकांकडून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, संभाजी पाटील, वासुदेव माने, उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे ,विराज खराडे, संदीप पवार, संजय सुर्वे, विजय नायडू, निलेश मोरे, निलेश निकम, सौ शारदाताई जाधव, विजय पाटील आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे. महामंडळावर त्यांची वर्दी लागल्यानंतर पक्ष वाढीसाठी चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे. तसेच महायुतीतील शिवसेना पक्षाचेही अस्तित्व वाढणार आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये नवीन बातमी जावलीकरांसाठी सावली निर्माण करेल असा अनेकांचा कयास आहे.
____________________________
फोटो– शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत युवा नेते श्री अंकुश कदम (छाया अजित जगताप, वाशी)