कराड(प्रताप भणगे,) : वनविभाग सातारा व वनपरिक्षेत्र कराड यांच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांविषयी जनजागृती व्हावी, तसेच प्राणी हे निसर्गचक्राचा अविभाज्य घटक आहेत, या जाणीवा समाजात पोहोचाव्यात यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत झालेल्या निबंध स्पर्धेत श्री निनाईदेवी विद्यालय, तुळसण येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कृती अनिल वीर, द्वितीय क्रमांक अक्षरा संदीप यादव, तृतीय क्रमांक रुद्र कृष्ण कुराडे यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून जानवी शंकर माने आणि प्रणाली अशोक मोरे यांना गौरविण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांचा वनपाल डी. बी. कांबळे, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, आनंदराव जानुगडे, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर आणि रघुनाथ पोतदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कांबळे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी प्राण्यांना आणि निसर्गाला जपले, तर निसर्गही आपल्याला जपतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार वैभव जाधव यांनी मानले.