नवी मुंबई – तंत्रज्ञानाच्या युगातही आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचा व कौटुंबिक ऐक्य राखण्याचा संदेश युवा प्रबोधन व्याख्याते गणेश शिंदे यांनी उपस्थित श्रोते युवक-युवतींना दिला. त्यांनी सांगितले की, आपल्या वागण्याचे अनुकरण मुले करत असतात; त्यामुळे पालकांनी सदैव चांगले सुसंस्कार निर्माण होईल याची काळजी घ्यावी.शिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आणि मराठा समाज नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा भवन, वाशी येथे मराठी भाषा अभिजात सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मान्यवर म्हणून गणेश शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानी, मासाहेब जिजाऊ, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमात प्रा. रवींद्र पाटील सर आणि अमरजा चव्हाण मॅडम यांनी संस्थांचा आढावा घेतला व सांगितले की, या माध्यमातून महान वक्त्यांचे प्रबोधनात्मक विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जाते. तसेच, दोन्ही संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत निधी देण्याची घोषणा केली.पर्यावरण पूरक S नॅपकिन बुके, शाल आणि राजमुद्रा प्रतिमा भेट देऊन गणेश शिंदे यांचा शिव तुतारी प्रतिष्ठान आणि मराठा समाज यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कविता डॉट कॉमच्या नारायण लांडगे, शंकर गोपाळे, रुद्राक्ष पातारे यांनी रसिक श्रोत्यांचे मन जिंकले. उपस्थित विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले, तर आभार वसंत तरडे यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी श्याम महाडिक, सुलेखनकार समेळकाका, श्रीहरी पवळे, रेखा कदम, अजय वाळुंज, निलेश पालेकर, कृष्णा सावंत, रमेश संकपाळ, राजेंद्र मोरे, वसंत जाधव, कल्पना देशमुख, सुनंदा राणे, भिमराव धुळप, श्री.प्रकाशनाईक,प्रणाली कदम,छाया मोरे,मालिनी घाग,शशिकांत सुर्वे,विजय देशमुख आणि इतर सहकारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचा समारोप बालकवी प्रसाद माळी आणि त्यांच्या टीमने पसायदान बोलून केला. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांनी मराठी भाषेच्या अभिजाततेचा अनुभव घेतला व संस्कृती जपण्याचे संकल्प व्यक्त केले.
नवी मुंबई येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त व्याख्यानमाला संपन्न
RELATED ARTICLES