मुंबई (शांताराम गुडेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर मधील मु. पो. आंगवली( लाखणवाडी )गावची सुकन्या अश्लेषा रमेश गुडेकर हिची युरोप येथे होणाऱ्या आआंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत अश्लेषा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. अश्लेषाने चमकदार कामगिरी करत आणखी एका खेळात तालुका, जिल्हयाचे नाव रोशन केले आहे. अश्लेषाने आतापर्यंत तब्बल ४३ पदके मिळवली आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा १० ते १६ नोव्हेंबर युरोप येथे होणार आहे अश्लेषाचे मूळ गाव आंगवली ( लाखणवाडी )मात्र गुडेकर कुटुंबीय गेली अनेक वर्षे कामानिमित्त मुंबई भांडुप येथे वास्तव्याला आहे. अश्लेषाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पराग विद्यालय भांडुप, बी.ए. पर्यंतचे शिक्षण तर मास मिडीयामधून रूईया कॉलेज माटुंगा येथे झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रकृती ठणठणीत रहावी यासाठी व्यायामशाळा सुरू केली.वयाच्या २१ व्या वर्षी पॉवरलिफ्टींग खेळाचे यडे घेण्यास सुरुवात केली. घरातील सर्वजण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.अश्लेषाने अथक मेहनत घेत घरच्या मंडळींचा, प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ ठरविला. माटुंगा येथे झालेल्या जिल्हास्तरीय पॉ वरलिफ्टींग स्पर्धेत ५० कि लो वजनी गटातून अश्लेषा प्रथमच सहभागी झाली जिद्द व आत्मविश्वासाने प्रदर्शन करत सुवर्णपदकाची कमाई केली यामुळे विश्वास वाढला अन् मागे फिरून पाहिलेच नाही. सकाळी ७ ते १० व रात्री ८ ते ११ यावेळेत दररोज ती पॉवरलिफ्टींगचा सराव करते. कर्नाटक, बंगलोर, दिल्ली, राजस्थान येथील स्पर्धेत तीने सहभागी होत देदीप्यमान कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे आत्तापर्यंत तिने २८. सुवर्ण, १२ रौप्य तर ३ कास्यपदके पटकावली आहेत.अश्लेषाला निलेश गराटे यांचे मार्गदर्शन व वडील रमेश गुडेकर यांची खंबीर साथ मिळत आहे.सध्या ती भाडुप येथील परफेक्ट जीममध्ये ट्रेनर म्हणून काम पाहत आहेत. चमकदार कामगिरीची दखल घेत युरोप येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉ वरलिफ्टींग सपर्धेसाठी अश्लेषांची वर्णी लागली आहे.
अश्लेषा गुडेकरची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड…. युरोपमध्ये रंगणार स्पर्धा; अश्लेषाची दैदीप्यमान कामगिरीची परंपरा, आतापर्यंत ४३ पदकांची मानकरी
RELATED ARTICLES