Monday, October 13, 2025
घरमहाराष्ट्रचार मंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात फुटलेली फरशी अजितदादांना गॉगल मधून दिसली...

चार मंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात फुटलेली फरशी अजितदादांना गॉगल मधून दिसली…

सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्ह्याचे पंचवीस वर्षांपूर्वी पालकमंत्री व राज्याचे विविध खात्याचे मंत्रीपद कुशलतेने चालवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि चाणक्य नजर राजकारणा इतकीच प्रशासनातही दिसून आली आहे. वर्षभरापूर्वी सातारा शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण झाले. पण, फुटलेली फरशी गॉगल डोळ्यावर असूनही पाहून अजितदादांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली. त्याबाबत आता सातारा जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एक वेळ चार मंत्री पद देण्यामध्ये महायुतीला यश आले आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, ग्राम विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन तथा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री मकरंद पाटील आणि महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले असे चार मंत्री लाभले आहेत. सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील अनेक बैठकींना ते उपस्थित असतात. त्यांच्या नजरेतून जिल्ह्याचा विकास होत असला तरी चाणक्य नजरेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शासकीय
विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाच्या पायरी नजीक फरशी फुटलेली पाहून चांगलीच एम बी उतरवली. शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी अचानक ते शासकीय विश्रामगृहात आले होते. जाताना तुटलेली फरशी पाहून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत त्यांनी विचार न केली. काळ्या काचेच्या गॉगल डोळ्याला असूनही त्यांची नजर फरशीच्या पर्यंत थेट पोहोचल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व उपस्थित अधिकाऱ्यांनी ही नवल व्यक्त केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बांधकाम विभागातील अनेक वास्तूंकडे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे त्यांच्या चाणक्य नजरेतून फुटलेली फरशी सुद्धा धन्य झाली. आता ही फरशी नव्याने बसवली जाईल. परंतु, अलीकडेच पावसाळ्यातच नवीन शासकीय विश्रामगृहातील अवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. अन्यथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पवार स्टाईलने चांगलीच बरसात केली असती. अशी चर्चा रंगू लागलेली आहे.
दरम्यान, या शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाच्या कामानंतर अशी अवस्था झालेली पाहून साताऱ्यातील विकास कोणत्या दिशेने चाललेला आहे. हे पाहणे गरजेचे आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी बारा वाजता श्री गणेश कंट्रक्शन, सातारा यांनी बांधकाम केलेल्या या विस्तारीकरणाची फरशी फुटून श्री गणेशा होऊन बांधकाम विभागाचे बारा वाजले आहेत. या तुटलेल्या फरशीची तातडीने अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. जिथे उपमुख्यमंत्र्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले जात नाही. तिथे सामान्य माणसांच्या आंदोलनाकडे मंत्री तरी कशाला लक्ष देतील? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वत्र वाढते अतिक्रमण, निकृष्ट दर्जाचे बांधकाम व रस्ते, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची अभेद युती यामुळे साताऱ्यातही वाल्मिकी पॅटर्न चांगलाच गाजत आहे. पक्ष बदलणाऱ्या कार्यकर्त्यांनी नक्कीच ठेका मिळवावा पण दर्जेदार कामे करा. अशी आता सांगण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.

फोटो – सातारा शासकीय विश्रामगृह विस्तारीकरणाच्या तुटलेल्या फरशीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री व मान्यवर (छाया– अजित जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments