Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रमानखुर्द येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा गुणवंत विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे...

मानखुर्द येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा गुणवंत विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण

प्रतिनिधी :

पंचशील अष्टांगिक मार्ग आणि २२ प्रतिज्ञांचे पालन केल्यास जीवनातील दुःखे नष्ट होऊन जीवन सुखकर होते असे प्रतिपादन सर जेजे समूह रुग्णालयाचे डॉ. रेवत कानिंदे यांनी केले . मानखुर्द पूर्व सिद्धार्थ चौक येथील पंचशील बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते
बौद्ध नवयुवक संघ व सुकेशिनी महिला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ . कानिंदे यांनी धर्मांतरानंतर बदललेली परिस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले . यावेळी ज्येष्ठ पत्रकार व एक वही एक पेन अभियानचे प्रणेते राजू झनके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ध्वजारोहण बुद्धवंदना , गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व खीरदान , भोजनदान मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र अंमलात आणल्यास समाजाची उत्तम प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही . इतरांकडे बोट न दाखविता आपण आपली रेघ मोठी करण्याकडे लक्ष्य केंद्रित करावे, मागील दहा वर्षांपासून आपण एक वही एक पेन अभियानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेला शिक्षणाचा मूलमंत्र अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत समाजानेही वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन झनके यांनी यावेळी केले . राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मुंबई करांनी सढळ हस्ते सहकार्य करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
सदर प्रसंगी झनके व डॉ. कानिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले . ऍड अमोल बोधिराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ,निलेश कांबळे राहूल आवडे सुकेशिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष अंजली मोहिते एक वही एक पेन अभियानचे शंकर कांबळे,राजू लोखंडे, सुनील वाकोडे सम्यक झनके यांच्यासह महिला आणि पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments