Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुंबई पालिकेला सशक्त सुरक्षितता हवी

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुंबई पालिकेला सशक्त सुरक्षितता हवी

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतीत सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे काही सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. सध्या वापरात असलेली सुरक्षा साधनसामग्री कार्यक्षम असली तरी काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे असे मत सुरक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत.

महापालिका सुरक्षा विभागाकडून सातत्याने सुरक्षा तपासणी आणि रक्षकांची कर्तव्यपूर्ती व्यवस्थित पार पडत असली तरी आकस्मिक परिस्थितीत अधिक वेगाने प्रतिसाद देता यावा, यासाठी अत्याधुनिक उपकरणांची जोड मिळाली तर लाभदायक ठरेल. काही पोस्ट वर खाजगी रक्षक आहेत. त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवत पालिकेचे रक्षक त्या पोस्टवर पाहिजेत.

शासन आणि महापालिका प्रशासन यांनी गेल्या काही वर्षांत सुरक्षेसाठी केलेली तरतूद लक्षात घेता, येत्या काळात आणखी काही अद्ययावत साधनांची भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण आणि महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबतही सकारात्मक हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागणार आहे.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या शहरात सुरक्षा व्यवस्थेचे सतत उन्नतीकरण हा नियमित प्रक्रियेचाच भाग असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे खाजगी रक्षक मुख्यालयाच्या इमारतीत ठेवल्याने इमारतीची व संबंधित मनुष्यबळाची सुरक्षा घोक्यात येऊ शकते. अशी भीती अधिकारी व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments