कराड(प्रताप भणगे ) : जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडी (ता.कराड) येथे दसरा निमित्त मा. अरविंद संपत खोत (विठ्ठलवाडी, तुळसण – सध्या मुंबईत नोकरी) यांनी सहपरिवार उपस्थित राहून विद्यार्थ्यांना लेजिम व ढोल संच वाटप केले. तसेच शाळकरी मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
श्री. खोत यांनी गेल्या तीन वर्षांपासून शाळेसाठी सातत्याने योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. 2023 मध्ये शाळेला डिजिटल पाट्यांचे वाटप,, 2024 मध्ये पेरूच्या रोपांचे वाटप, आणि 2025 मध्ये लेजिम व ढोल संचाचे वाटप, अशा स्वरूपात शाळेच्या विकासात त्यांचा हातभार लागला आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षकवृंद, तरुण वर्ग व विद्यार्थी यांनी याप्रसंगी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना अरविंद खोत यांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी शाळेसाठी आपल्या परीने काहीतरी देण्याचा संकल्प केला आहे. गावातील शाळा टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने थोडेफार योगदान द्यावे. देण्याची मानसिकता प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे.”