Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रसंभाजी शामराव पाटील यांना "राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025" जाहीर

संभाजी शामराव पाटील यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025” जाहीर

सांगली(विजया माने) : कापूसखेड (ता वाळवा जि सांगली ) येथील रहिवासी संभाजी पाटील यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल ‌ शिवप्रतिष्ठान संस्था पुणे यांच्याकडून यंदाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार वितरण सोहळा 26 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पद्मावती रोड आळंदी पुणे येथे संपन्न होणार आहे संभाजी पाटील यांना अध्यात्मिक क्षेत्रामधील उल्लेखनीय कामासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ( बाल शिवयोगी दत्त मंदिर कापूसखेड ) याची त्यांनी ‌ लोकसहभागातून ‌ उभारणी केली आहे ‌ आध्यात्मिक क्षेत्रातील जानकार व तज्ञ मंडळी यांनी बालशिवयोगी दत्त मंदिर याबद्दल असे सांगितले आहे की हे मंदिर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कापूसखेड गावांमध्येच आहे तसेच ‌ संभाजी पाटील गेली 18 वर्ष ‌ प्रत्येक गुरुवारी ( औदुंबर ‌) तालुका पलूस ‌ येथील दत्त दर्शनासाठी जातात ‌‌ या अध्यात्मिक कामासाठी ‌ संभाजी पाटील यांना ‌ त्यांचे सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज ‌ , पडवळवाडी तालुका वाळवा ज्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा पुरस्कार कापूसखेड गावच्या इतिहासातील एक मानाचे पान मानले जात आहे , कुटुंबीय नातेवाईक मित्र मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक , विविध सोसायटी , सरपंच , उपसरपंच , विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी संभाजी पाटील यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments