मुंबई : मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सोमवारी सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी देखील उपस्थित होते.
राहुल शेवाळे यांनी सकाळीं 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील उद्यान गणेश आणि कालीमाता मंदिरात दर्शन घेऊन वॉक केला. त्यानंतर जिमाखन्याच्या टेनिस कोर्टवर टेनिसचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी पार्क ओपन जिम मध्ये जाऊन युवकांसोबत व्यायाम केला. तसेच नाना नानी पार्क मध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला. मॉर्निंग वॉक संपल्यानंतर बालमोहन शाळेजवळील नागरिक कट्ट्यावर बसून चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी संवाद साधला. दादर परिसरातील नागरिकांनी यावेळी राहुल शेवाळे यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.