तापोळा ( नितीन गायकवाड) : नवरात्र उत्सव बहुउद्देशीय विकास मंडळ, ग्रामस्थ व व्यापारी मंडळ तापोळा यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अरुण नारायण धनावडे यांच्या स्मरणार्थ रक्तदान व आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
आरोग्यस्वस्त नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत आयोजित या शिबिरात 115 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात 77 पुरुष, 38 महिला सहभागी झाले. Hb तपासणी 96 नागरिकांची झाली, तर 11 किशोरवयीन मुलींचा सहभाग नोंदविण्यात आला. तपासणी दरम्यान 3 उच्च रक्तदाब संशयित, 4 मधुमेह संशयित, 3 अॅनिमिक रुग्ण व 1 तोंडाच्या कॅन्सरचा संशयित आढळला.
रक्तदान उपक्रमात 44 दात्यांनी रक्तदान केले, त्यात 37 पुरुष व 7 महिला होत्या. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कदम, डॉ. मयूर खामकर, आरोग्य सहायिका सोनाली निकम, आरोग्य सहाय्यक सागर तरडळे, सौ. पूनम रणसुरे, श्रीकांत माने, वैभव वीरकर, सुरेंद्र गोरे, सौ. ऋतुजा बांगर, वाहन चालक गणेश भोपळे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी बेल एअर वाई यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ऑर्थोतज्ञ डॉक्टरांमार्फत हाडदुखी व सांधेदुखीची तपासणीही झाली.
या शिबिरात कै. अरुण धनावडे यांच्या परिवाराचे योगदान उल्लेखनीय ठरले. प्रकाश दादा धनावडे, विठ्ठल धनावडे, सौ. कविता धनावडे, सुवर्णा धनावडे यांच्यासह अध्यक्ष शिवाजी भोसले, सरपंच रमेश धनावडे, उपसरपंच तुकाराम धनावडे, चेअरमन आनंद धनावडे, माजी सरपंच दर्शनाताई धनावडे, उद्योजक विजयशेठ झरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी श्री. अमोल माने व सौ. ऋतुजा शेलार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.