प्रतिनिधी : आरक्षण म्हणजे उपकार नाही, तर व्यवस्थेने केलेल्या शतकानुशतकांच्या अन्यायाची परतफेड आहे,” असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित आरक्षण अंमलबजावणी मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मेळाव्याचे सुरदास सचिन अंभोरे यांनी उद्घाटन केले. नामदेवराव निकोसे, रवी शेंडे, डॉ. आशा पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.
बागडे म्हणाले, आरक्षणाचा सर्वाधिक फायदा उच्च पदावर पोहोचलेल्या घटकांनी घेतला; पण त्यांनी आपल्या समाजाची जबाबदारी पार पाडली नाही. आजही अन्न-वस्त्र-निवार्यासाठी शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात. आता चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मेळाव्याचे सुरदास सचिन अंभोरे यांनी उद्घाटन केले. नामदेवराव निकोसे, रवी शेंडे, डॉ. आशा पारधे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. रमेश दुपारे यांनी सूत्रसंचालन तर धर्माजी बागडे यांनी आभार मानले.