मुंबई – कोकणातील वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र आणि भांडुप विभागातील प्रसिद्ध शिक्षक, पत्रकार आणि साहित्यिक श्री सुरेश भिवाजी पाटील यांना ग्लोबल ह्युमन पिस युनिव्हर्सिटी या जगप्रसिद्ध विद्यापीठाकडून *शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रातील कार्यासाठी मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate)* जाहीर झालीयाबद्दल श्री सुरेश पाटील यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.श्री सुरेश पाटील यांची महाराष्ट्र शासना तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तसेच ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आहेत. वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, भारतीय मानवाधिकार संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष आहेत तसेच साई एज्युकेअर ट्रेनिंग स्कूल या संस्थेचे संचालक आहेत. गेली २१ वर्ष सातत्याने शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात गेली २१ वर्षे अविरतपणे कार्य करत असताना, या केलेल्या कार्याचा हा बहुमान आहे. या कार्यामध्ये मला खंबीरपणे साथ देणारे माझे आई – वडील, सासू – सासरे, माझी पत्नी वृषाली, मुलगा साई आणि माझे सर्व सहकारी, हितचिंतक यांच्यामुळे मला हा प्रवास आजवर करता आला हे मी विनम्रपणे कबूल करतो अशा भावना श्री सुरेश पाटील सर यांनी व्यक्त केल्या.
सुरेश पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी मानद डॉक्टरेट जाहीर
RELATED ARTICLES