मुंबई : तिसरा नॉर्थईस्ट इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (NIIFF) 2025 नुकताच मुंबईतील जुहू मेयर हॉल येथे भव्य उत्साहात पार पडला. Find Studioz च्या पुढाकाराने आयोजित या फेस्टिवलमध्ये भारतासह विविध देशांतील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या माध्यमातून ईशान्य भारताची समृद्ध संस्कृती आणि उत्कृष्ट चित्रपट कलाकृतींचा आनंद रसिकांना घेता आला.
या फेस्टिवलचे अध्यक्ष मोहन दास, उपाध्यक्ष अनुराग त्रिपाठी आणि सह-संस्थापक शिराज हेनरी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संचालन केले.
फेस्टिवलमध्ये अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यामध्ये सुनिल जोडे (अध्यक्ष–ICCAA), कृष्ण पिंपले (कौंसिल ऑफ तंजानिया, चेन्नई – मुख्य अतिथी), अतुल कुलकर्णी (अध्यक्ष – नमस्ते फाउंडेशन, गुवाहाटी), सुरेश थॉमस (क्रेसेंडो म्युझिक), ज्येष्ठ अभिनेता राजेंद्र गुप्ता तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार व दिग्दर्शकांचा समावेश होता.
फेस्टिवलमध्ये यंदा विशेष लक्ष महिला चित्रपट निर्मात्यांवर केंद्रीत करण्यात आले. त्यांना सन्मानित करून उदयोन्मुख प्रतिभांना प्रोत्साहन देण्यात आले.
प्रमुख पुरस्कार विजेते :
सर्वोत्तम फीचर फिल्म : तारीख – हिमज्योति तालुकदार, दुसरी सर्वोत्तम फीचर फिल्म : कैनखोल (माझे कुटुंब) – सिंग पीयर्सन अनाल, ज्युरी पुरस्कार (फीचर फिल्म) : आदि – दिबाकर पेगू, सर्वोत्तम दिग्दर्शक : हौशी अमॅचर्स – धीरज कश्यप, सर्वोत्तम डेब्यू दिग्दर्शक : ओथरेई – सेव्ह माय सोल – दिनेश नौरम सौरोकहाइबम, सर्वोत्तम अभिनेता : बोलोराम दास (तारीख), सर्वोत्तम अभिनेत्री : अनिंदिता रुद्राज (झंकार – द मेलडी ऑफ रेझोनन्स), सर्वोत्तम महिला चित्रपट निर्माती : भवानी डोले ताहू (द क्राय ऑफ अ लाइफलेस)
याशिवाय लघुपट, डॉक्युमेंटरी, प्रयोगशील चित्रपट आणि विविध ज्यूरी पुरस्कारांनीही ईशान्य भारतातील चित्रपटकलेची वैविध्यता उजागर झाली.
हा पुरस्कार समारंभ CSIB ग्रुप, ICCAA, EON Films, 91 Coin Foundation, Orange City Saoji Management Services Pvt. Ltd., अवतार क्रीडा पोषण, व्हीएनआर इन्व्हेस्टमेंट, क्रेसेंडो म्युझिक आदी संस्थांच्या सहयोगाने यशस्वी करण्यात आला.
फेस्टिवलच्या संस्थापक रेबेका चांगकिजा सेमा यांनी म्हटले की, “NIIFF हे ईशान्य भारत आणि जागतिक चित्रपटसृष्टी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत आहे.” सह-संस्थापक शिराज हेनरी यांनी सर्व सहभागी, भागीदार आणि समर्थकांचे आभार मानले.
तिसरा NIIFF हा केवळ चित्रपटांचा सोहळा न ठरता सांस्कृतिक विविधतेचे एक सकारात्मक व्यासपीठ ठरला. या निमित्ताने ईशान्य भारतातील कला, संस्कृती आणि प्रतिभेला जागतिक पातळीवर नवे दालन खुलले आहे.
