मुंबई : मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत राज्याचे कॅबिनेट मंत्री व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. नितेश राणे यांनी दिलेल्या निवेदन आणि सूचना नुसार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपद्रवी व आजारी हत्तींबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
यावेळी श्री नाईक यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर करून उपद्रवी हत्ती वनविभागामार्फत स्थलांतरित करावेत. आजारी हत्तींच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी त्यांना वनतारा येथे हलविण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.