Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रअमेरिकेचा हत्ती शुक्रवारी धारावीच्या शाळेला भेट देणार

अमेरिकेचा हत्ती शुक्रवारी धारावीच्या शाळेला भेट देणार

धारावी : धारावीमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी अमेरिकेहून अ‍ॅली नावाचा हत्ती (मादी) येत्या ३ ऑक्टोबर रोजी येणार आहे.हा हत्ती खराखुरा जंगली हत्ती नसून तो रोबोटिक हत्ती- यांत्रिक हत्ती असून हा हत्ती येण्याच्या घोषणेने धारावी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.पृथ्वीतलावर सर्वात मोठा भूचर प्राणी म्हणजे हत्ती.हुबेहूब तशाच हत्तीला आम्ही कधी भेटू, त्याला स्पर्श कसा करु अशा नयनरम्य कल्पना या शाळेतील अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी मुले मुलींच्या मनामध्ये आत्तापासूनच दाटू लागल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,छत्रपती शिवाजी राजे विद्यालय या दोन शाळा मराठी,हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा बहूभाषिक माध्यमांच्या असून या शाळा महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई या संस्थेतर्फे चालविण्यात येत आहेत.याच संस्थेतील विद्यार्थी शिक्षकांनी अ‍ॅलीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु केली आहे,असे संस्थेचे चेअरमन माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
आशिया खंडातील एखाद्या शाळेला भेट देण्याची अ‍ॅलीची ही पहिलीच वेळ आहे.या भेटीचे अर्थात *एलिफंट शो*चे आयोजन रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे-पेटा प्राणी मित्र संघटना यांच्या सहकार्याने अमेरिकेतील मॅटर्ली
फाऊंडेशनने केलेले आहे,असे चेअरमन बाबुराव माने यांनी सांगितले.
व्हाईस फाॅर व्हाईसलेस (व्यक्त न होणार्‍यांना आवाज,ताकत देणे)
या शिर्षकाखाली होत असलेल्या या एलिफंट शो मध्ये मुला मुलींना हत्तीच्या सर्व अवयवांना स्पर्श करता येणार आहे. खऱ्या खुऱ्या हत्तीला स्पर्श केला का तो हत्ती आपल्या त्वचेची हालचाल करतो तव्दतच या हत्तीला स्पर्श होताच तोही त्वचेच्या हालचाली करील.आपली देहाची शान असलेल्या सोंड्याच्या हालचाली ती करील.कानने ती ऐकेल आणि विद्यार्थ्यांशी ती बोलेलही. या शो चे खास वैशिष्ट्य म्हणजे ही हत्तीन मादी असून शो दरम्यान ही हत्तीन विद्यार्थ्यांसमोर ३० मिनिटांचे स्वगत करणार आहे.माझी सर्कशीत होणारी छळवणूक,मानवी त्रासापासून कशी मी वाचले,मी आहे कोण? मी कोठून आले,तुम्हा मुलांसोबत मला मुंबईत कसे छान छान वाटते असा आपला जीवन प्रवास यावेळेस ही अ‍ॅली मुला मुलींना कथन करणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना हत्तीचे जीवन तिच्या मुखामधूनच ऐकण्यास मिळणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना यावेळी हत्तीला हिंदी आणि इंग्रजीत प्रश्नही विचारता येतील. अभ्यासक्रम, सिलॅबस, जनरल नाॅलेज, जिज्ञासा,कला,क्रीडा यासंदर्भातील प्रश्न मुलांना या अ‍ॅलीला विचारता येणार आहे.विशेष म्हणजे या प्रश्नांची उत्तरेही ही अ‍ॅली देणार आहे.यामुळे हा एलिफंट शो हा एक शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणाराही ठरणार आहे.मुलांची जिज्ञासा वृत्ती जागी करणे,लाजाळू ,न्यूनगंड असलेल्या मुलांमधील दोष दूर करण्यासाठी हा एलिफंट शो नक्कीच चांगला आहे असे शाळेच्या प्रिन्सिपल स्वाती होलमुखे यांनी सांगितले.

*_एलिफंट शोसाठी आशिया* *खंडातून निवडलेली पहिली शाळा_*

आशिया खंडातून आमच्या शाळेची पहिली निवड या एलिफंट शो साठी केली याचा अभिमान आमच्या शाळेस,संस्थेस आहे.हा शो आमच्या शाळेत आयोजित केल्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ बाॅम्बे, पेटा- प्राणी मित्र संघटना, मॅटर्ली फाऊंडेशचे खूप खूप आभार मानतो,असे महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबईचे चेअरमन माजी आमदार बाबुराव माने यांनी म्हटले आहे.

_मुलांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम जागृत करणे_
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा विचार करीत नेहमीच नव नवे उपक्रम राबण्यात महात्मा एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई ही संस्था,शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक प्रिन्सिपल हे सतत अग्रेसर असतात.नव्या काळाबरोबर माझा विद्यार्थीही पुढे गेला पाहिजे.त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावल्या पाहिजेत. प्राण्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम भूतदया जागृत करणे यासाठी हा एलिफंट शो नक्कीच एक चांगला उपक्रम आहे,असे प्रिन्सिपल स्वाती होलमुखे- प्रिन्सिपल श्रध्दा प्रमोद माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.

खऱ्या हत्तीशी कसे वागावे
ही शिकवण मुलांना मिळेल
सर्कस, उत्सव-धार्मिक सोहळे आणि ओझी वाहणे- फेऱ्या मारणे अशा कामांमध्ये खऱ्या हत्तीची मानवाकडून कशी छळवणूक होते. विशेषत: खऱ्या हत्तींपासून मानवाने सुरक्षित अंतर ठेवून त्याचे कल्याण कसे करावे..आणि खऱ्या हत्तीला वाईट वागणूक देऊ नये.त्याच्याशी गैरवर्तन नकोय अशीही शिकवण या एलिफंट शो मधून विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे माजी आमदार संस्थेचे चेअरमन बाबुराव माने यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments