प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सोमनाथ शेट्ये यांच्या अधिपत्याखाली सौरभ मित्र मंडळाच्या ‘अन्नमित्र’ च्या माध्यमातून केईएम आणि टाटा रुग्णालयाजवळ भर पावसात रविवारी गरीब गरजूंना अन्नदान आणि फळदान करण्यात आले. मंडळाचे हितचिंतक अन्नमित्र श्री. संतोष बाजीराव भोसले यांच्या मामे सासू सौ. चित्राक्षी सुधाकर शेट्टीगार यांनी तिसऱ्यांदा त्यांचे वडील कै. वासू म. शेट्टीगार यांच्या पुण्यस्मरणार्थ टाटा आणि के ई एम रुग्णालय परिसरातील प्रत्येकी २५० रुग्णांना व गरजूंना खिचडी वाटप केले. आठव्यांदा सौ. सुलभा अशोक गोरीवले व श्री. अशोक महादेव गोरीवले यांनी शारदीय नवरात्री उत्सव निमित्त प्रत्येकी २५० रुग्ण – उपेक्षितांना केळी, दह्याचे पॅकेट व बिस्कीट पॅकेट वाटप केले. तसेच नेहमी प्रमाणे प्रभादेवी चिकन शॉपचे मालक गफ्फार शेख यांच्या वतीने २५० रुग्णांना लाडू वाटप करण्यात आले. धनमिल नाका येथील छेडा टी सेंटर व छेडा मसाले यांचे मालक श्री. विपुलभाई मणिलाल छेडा यांनी प्रत्येकी २५० रुग्ण व उपेक्षितांना मोसंबी फळ वाटप केले. अन्नमित्र शिवसैनिक श्री. सुरेश दासा यांचे मित्र प्रभादेवी येथील अय्यपा अण्णा इडली हे पुन्हा रुग्णांना ७० प्लेट इडली चटणी वाटप केले. या अन्नदानाला दात्यांच्या उपस्थिती सह ज्या सर्वांनी नेहमी प्रमाणे आवर्जून सहभाग घेऊन श्रमदान केले त्या सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळेच आम्ही आजचे अन्नदान यशस्वीपणे करू शकलो, अशी कृतज्ञतेची भावना संजय शेट्ये यांनी व्यक्त केली.
भर पावसात अन्नमित्र तर्फे टाटा केईएम जवळ अन्नदान ; शेकडो जणांनी घेतला लाभ
RELATED ARTICLES