Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रजावळीत भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी कदम कदम बढाये जा नारा...

जावळीत भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी कदम कदम बढाये जा नारा…

मेढा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे वारे वाहू लागलेले आहे. सातारा जावळी मतदारसंघांमध्ये महायुतीवर अंकुश ठेवण्यासाठी कदम कदम बढाये जा नारा देण्यात आला आहे. हे आता उघड झाली आहे.
सातारा जावळी तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राजकीय दृष्ट्या फार मोठी हालचाल झाली नाही. लोकप्रिय लोकप्रतिनिधी असलेल्या सब कुछ मंत्री शिवेंद्रसिंह राजे बाबा असे सातारा जावळी खोऱ्यात वातावरण निर्माण झाल्यानंतर खूप मोठी विरोधी पक्षाची पोकळी जाणवत होती. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केला आहे. यापूर्वी अंकुश कदम यांनी नवी मुंबईत निवडणूक लढवून आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने नवी मुंबईतही शिवसेना नेते गणेश नाईक यांची अडचण दूर झाली आहे.
जावळी खोऱ्यातील मालचुंडी गावचे विद्या विभूषित असलेल्या युवा नेते अंकुश कदम यांना त्यांच्या कार्यास साजेस शिवसेना पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम विजयादशमी पूर्वीच नवी मुंबईत करून शिवसेनेचा धनुष्य बाण जावळी खोऱ्यात पुन्हा एकदा रणांगणात चालवण्याची शक्ती निर्माण केली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना आपले राजकीय वजन दाखवावे लागणार आहे. पूर्वी शिवसैनिकांना मॅनेज करून निवडणुकीच्या रणनीती मध्ये आपलेसे केले जात होते. आता शिवसेनेला इतरांवर अंकुश ठेवण्यामध्ये निश्चितच यश मिळणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून युवा नेते अंकुश कदम यांचा शिवसेना पक्ष प्रवेश फलोदायी ठरणार आहे. शिवसेनेच्या नावावर स्वतःच व्यक्तिमत्व उंचीपेक्षा मोठे करणाऱ्यांना चपराक बसणार आहे. असे ही भाकीत वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना या चार शब्दावरून निष्ठा असणाऱ्यांना आता लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.हे आता लपून राहिलेले नाही. मेढा नगरीत दही हंडी कार्यक्रम निमित्त युवा नेते अंकुश कदम यांनी अनेकांना व्यासपीठावर बोलवून त्यांची मानसिकता जाणून घेतली. दुसऱ्या फळीचे महायुती मधील कार्यकर्त्यांना संधी नसल्यामुळे त्यांना शिवसेनेने द्वार खुले केले आहे. अनेक काँग्रेस व राष्ट्रवादी मधील कार्यकर्ते हाती शिव धनुष्य घेण्यास तयारच आहेत. जावळी तालुक्यातील तापोळा ,केळघर ,कुडाळ, सायगाव, करहर परिसरात आजही शिवसैनिक आहेत. त्यांना एकत्र केले तर खऱ्या अर्थाने जावळीचा स्वाभिमान व जावळीच्या इतिहासात पुन्हा एकदा भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर एक हाती सत्ता आल्याने महायुतीलाही धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक व कार्यकर्ते निश्चितच अंकुश कदम यांना साथ देतील असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, नवी मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळेला सातारचे सुपुत्र विजय चौगुले, मंत्री उदय सामंत व जावळीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. जावळीचे सुपुत्र आ शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांच्यानंतर हा दुसरा युवा नेता शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या हाती आला आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जावळीमध्ये पुन्हा एकदा राजकीय कलिंगी तुरा दिसेल अशी चर्चा सुरू झालेली आहे.
फोटो – नवी मुंबई येथे जावळीचे सुपुत्र अंकुश कदम शिवसेना पक्षप्रवेशाच्या वेळी (छाया– अजित जगताप नवी मुंबई)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments