Tuesday, October 14, 2025
घरआरोग्यविषयकसार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीर संपन्न

सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीर संपन्न

मुंबई : धारावीतील आदर्श क्रीडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शेटवाडी, धारावी मेन रोड येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले. सिद्धीका फाउंडेशन व आयुर्विध्या प्रसारक मंडळ संचालित शीव आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचा १०० ते ११० रहिवाश्यांनी लाभ घेतला. समाजसेवक स्वाती फलटणकर, जयश्री सोनावणे, शितल सदाफुले, नमिता सोनवणे, सुनिल कावळे, अनिल शिवराम कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन सिद्धीका फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मी सुनिल कावळे यांनी अथक परिश्रम घेऊन केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments