सातारा(अजित जगताप) : कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्यात मदत होते. परंतु, सातारा जिल्ह्यात आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्न प्रलंबितच राहत आहेत. आंदोलनामुळे काही आंदोलकाची परिस्थिती बिघडत आहे. याबाबत काळजी करणाऱ्या एका आई ने चक्क आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलक कार्यकर्त्यांची विचारपूस केली. या भावनिक भेटीने अनेक जण गहिवरून गेले आहेत.
याबाबत माहिती अशी की, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाढे तालुका जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ६३ नंबर ३ येथील गॅस स्टेशन परवानगी बाबत प्रशासनाने माहिती द्यावी व उपाययोजना करावी. यासाठी पाच दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष आहे, ज्यांनी कर्तव्यदक्षतेने लक्ष द्यावे असे जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस यंत्रणा व पुरवठा विभाग यापैकी कोणीही त्याबाबत मोठा दबाव असल्यामुळे लक्ष देत नाही. अशी परिस्थिती अनेक आंदोलनाची होत असते.
काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी गर्दी झाली होती.सोमवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी श्रीमती रोहिणी अनिल उबाळे यांनी भेट दिली. आंदोलनासाठी बसलेले त्यांचे चिरंजीव श्री रमेश अनिल उबाळे व इतर आंदोलकांच्या तब्येतीची ही विचारपूस केली. जिल्हा प्रशासन जोपर्यंत न्याय देत नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे आंदोलकांचे पालक सुद्धा यामध्ये सामील झाले.
सदरची घटना सातारा जिल्ह्यात प्रथमच घडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने माणुसकी म्हणून या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे. यावेळी आंदोलन करते रमेश अनिल उबाळे, महेश रणदिवे, पांडुरंग बल्लाळ, बाबुराव चव्हाण, रियाज मुलानी व सुनिता आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
______________________
फोटो – आंदोलन मुलाच्या प्रकृतीच्या विचारपूस साठी आई आली धावून (छाया-निनाद जगताप, सातारा)