मुंबई(संतोष काळे) : शिवडी कोळीवाडा विभागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार मित्र मंडळाने यंदा पहिल्यांदाच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध रक्तपेढ्यांना भेट दिल्यानंतर समजले की वाडिया रुग्णालय हे थायलेसेमियाग्रस्त सुमारे ६०० लहान रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करते. यामध्ये टाटा व वाडिया रुग्णालयातील रुग्णांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच रक्तदान शिबिरासाठी वाडिया हॉस्पिटलला सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमात लालबाग, परेल, दादर व शिवडी परिसरातील गणेश मंडळे व नवरात्रोत्सव मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळाचे पदाधिकारी म्हणाले – “चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया. थायलेसेमियाग्रस्त लहानग्यांच्या जीवनासाठी प्रत्येक थेंब रक्त अमूल्य आहे.