प्रतिनिधी : लोकसभेची रणधुमाळी सुरू असून लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहेत. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातच आपले ठाण मांडून आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला रोखठोक मुलाखत दिली आहे. उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी थेट उत्तरं दिलीत. अनेक विषयांवर परखड मते माडंली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या मोगलाईवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या लोकशाही टिकविण्यासाठी निकराचा लढा सुरु आहे. हे महाभारत त्यासाठीच सुरु आहे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी हा लढा सुरु आहे, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. महाराष्ट्रात भगवी लहर आहे. राज्यासह देशात बदल नक्की होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
अमित शहा मोदी,शिंदेवर संजय राऊत यांचे प्रश्न अन उद्धव ठाकरे यांची रोखठोक उत्तरे..
RELATED ARTICLES