Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआपुलकीच्या आणि मायेच्या सन्मानाने भारावली डाकेवाडीकरांची मने

आपुलकीच्या आणि मायेच्या सन्मानाने भारावली डाकेवाडीकरांची मने

कराड, वार्ताहर : सलग दोन वर्ष फक्त आणि फक्त गावच्या मंदिराच्या पुर्णत्वाचा ध्यास  आणि अहोरात्र त्याचाच विचार, त्यासाठी श्रमदान करणाऱ्या डाकेवाडीतील हातांचा  सत्कार शिवसमर्थ परिवाराच्या वतीने अॅड.जनार्दन बोत्रे आणि त्यांचे सहकारी यांनी केला. या आपुलकीच्या आणि मायेच्या सन्मानाने श्री दत्त मंदिर डाकेवाडी जीर्णोध्दार समितीचे सदस्य आणि या समितीला सहकार्य करणारे गावातील ग्रामस्थ या सर्वांना संपूर्ण पोशाख देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनिल डाकवे, नानासाहेब सावंत, नितीन पाटील, काळंबादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब शिबे, रेश्मा डाकवे, भारतीताई डाकवे, अनुसया डाकवे, आबासाहेब शिबे, डाॅ.संदीप डाकवे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी हा कार्यक्रम घेण्यापाठीमागची भूमिका डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रास्ताविकातून मांडली. यावेळी शिवसमर्थ परिवाराचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांनीही ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले, ‘‘गाव एकत्र असेल तर काय होवू शकते याचा आदर्श आज डाकेवाडीने  सातारा जिल्हा व महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. डोंगर विभागातील लोकांनी आपल्या प्रगतीसाठी एकत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसहभागातून अतिशय सुंदर आणि देखणे मंदिर आज डाकेवाडीत उभारले आहे ही बाब कौतुकास्पद आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यासाठी श्रमदान करणाया व्यक्तींचा सन्मान करुन इतरांना प्रेरणा देण्यासाठी हा अनोखा कार्यक्रम घेतला आहे.’’
याप्रसंगी अनिल डाकवे बोलताना म्हणाले की, ‘‘लोकसहभागाची, श्रमदानाची संकल्पना नामशेष होत असताना आमच्या गावाने उत्स्फुर्त सहभाग घेवून श्रमदानातून सुंदर असे मंदिर उभे केले आहे. यामध्ये गावातील प्रत्येकाचा सहभाग मोलाचा होता. लहान व्यक्तीपासून वयोवृध्द व्यक्तीपर्यंत सर्वांनी आपले योगदान यामध्ये दिले आहे. मंदिराचे बांधकाम गावातीलच तुकाराम डाकवे आणि अवधूत डाकवे यांनी विनामूल्य करुन एक आदर्श उभा केला आहे. त्यांना योगेश डाकवे या युवा इंजिनियरचेही सहकार्य लाभले. यापुढेही गावाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे अशी अपेक्षाही अनिल डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.’’
यावेळी श्री दत्त मंदिर जीर्णोध्दार समितीमधील अध्यक्ष तुकाराम डाकवे, पांडूरंग जाधव, बाळू डाकवे, आनंदा चिंचुलकर, श्रीरंग डाकवे, हरी डाकवे, वसंत डाकवे, तुकाराम डाकवे, अशोक डाकवे, शंकर डाकवे, शामराव डाकवे, लक्ष्मण डाकवे, बाळू डाकवे, आनंदा डाकवे यांच्यासह समितीला दैनंदिन कामात सहकार्य करणारे विठ्ठल डाकवे, काशिनाथ डाकवे, पांडूरंग जाधव, महादेव डाकवे, अंकुश डाकवे, गणेश  डाकवे, जोतिराम डाकवे, लक्ष्मण घाडगे, आनंदा घाडगे, संजय डाकवे, शामराव डाकवे, हरी जाधव, अवधूत डाकवे, तुकाराम डाकवे, योगेश डाकवे, परशराम जाधव, आनंदा डाकवे यांचा हृदय सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या वतीने अॅड.जनार्दन बोत्रे, अनिल डाकवे, रेश्मा डाकवे, अनुसया डाकवे, भारतीताई डाकवे आणि डॉ.संदीप डाकवे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी प्रकाश शिबे-पुजारी, गणेश महाडीक, बाळकृष्ण शिबे, जगन्नाथ शिबे, पोलीस पाटील गणेश  डाकवे उपस्थित होते.
याप्रसंगी अवधूत डाकवे यांनी रांगडया शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. या सन्मानामुळे भविष्यामध्ये गावासाठी काम करण्यासाठी आणखी उर्जा आणि प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी समितीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान यावेळी अॅड.जनार्दन बोत्रे व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत श्री दत्त मंदिराची महाआरती करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासो मोहिते, सचिन बागाव, शांताराम ताईगडे तसेच गावातील ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष  परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments