Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्र"स्वच्छता हीच ईश्वर सेवा" सुपने गावातील ग्रामस्थांनी केले श्रमदान

“स्वच्छता हीच ईश्वर सेवा” सुपने गावातील ग्रामस्थांनी केले श्रमदान

प्रतिनिधी : “स्वच्छता ही ईश्वर सेवा” उपक्रमांतर्गत सुपने गावात आज श्रमदान मोहिमेचे आयोजन उत्साहात पार पडले. शासनाच्या संकल्पनेनुसार “प्रत्येक ग्रामपंचायत – एक दिवस – एक तास – एक साथ श्रमदान” या उद्दिष्टाखाली गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान केले.

या उपक्रमास जिल्हा परिषद सातारा यांच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी पंचायत समिती कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा तज्ञ राजेश भोसले, विस्तार अधिकारी सुरज येरवळकर पुनम पाटील, ज्योती आंबवडे, सुभाष साळुंखे, ग्रामपंचायत सुपनेचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, आदर्श ज्येष्ठ नागरीक,श्री केदार हायस्कूल, जि. प. शाळा, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, प्रा. आरोग्य केंद्र, वैभवी महिला बचत गटाच्या सदस्या,सर्व शिक्षक, विद्यार्थी व इतर पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता फेरी, मशाल रॅली, सायकल रॅली व स्वच्छता साखळी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता कार्यक्रमाचे कौतुक सुपने परिसर ग्रामस्थांकडून केले जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments