Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रईव्हीएम मशिन गोदामातील साताऱ्यात सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली…

ईव्हीएम मशिन गोदामातील साताऱ्यात सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली…

सातारा(अजित जगताप) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडली या सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षिततेसाठी सातारा येथील गुदामा मध्ये बंदिस्त करण्यात आले त्यावर दिवस रात्र वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे ठेके देण्यात आले परंतु काल दुपारी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे राष्ट्रवादी सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने याबाबत लेखी तक्रार केली आहे . सदर ठेकेदारावरती योग्य ती कारवाई केली जाईल असे सातारा जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी ६३.१६ टक्के मतदान झाले. झालेले मतदान हे ईव्हीएम मशिनमध्ये असून सर्व ईव्हीएम मशिन्स सातारा एमआयडीसी येथील डी.एम.ओ गोदामात सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत. त्या मशिसच्या सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच सीसीटीव्ही आहेत. मात्र, हे सीसीटीव्ही दि.१० मे रोजी सकाळपासून बंद असल्याची बाब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे . त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सी.सी.टी.व्ही. पुरवठा ठेकेदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यात याव्यात याकरता आंदोलनेही सातारा जिल्ह्यात झाले. दुसऱ्या बाजूला ईव्हीएम मशिनमध्ये कोणताही फेरफार करता येत नाही. ईव्हीएम मशिनमध्ये सुरक्षित मतदान करता येते. असे निवडणूक आयोगाकडून प्रचार आणि प्रबोधन करण्यात आले होते.
सातारा लोकसभेसाठी दि. ७ मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजता मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेचे सर्व ईव्हीएम मशिन्स हे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एमआयडीसीतील डी.एम.ओ. गोदामात सुरक्षित ठेवल्याचे मीडियाच्या काही प्रतिनिधींना सांगितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी तेथे जावून सुरक्षीततेबाबतची तपासणी केली. डीएमओ गोदामामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आहे त्याचबरोबर पोलीस सुरक्षाही आहे. असे असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही यंत्रणा दि. १० रोजी सकाळपासून वारंवार बंद दिसत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
ईव्हीएम मशिनच्या संरक्षणासाठी बसवलेली सी.सी.टी.व्ही.ची लिंक ही उमेदवार प्रतिनिधी यांच्याकडे असल्यामुळे ही बाब निदर्शनास आली. त्याच तक्रारीची दखल सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेवून लगेच संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवार दि. ११ रोजी दिवसभर त्याच तक्रारीच्या अनुषंगाने गोदाम परिसरात कार्यवाही सुरु होती. त्याबाबत गोपनीयता ही पाळण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सीसीटीव्ही पुरवठा करणारे ठेकेदार मनेषकामर गणेशलाल सारडा सिद्धीविनायक सिक्युरिटी सिस्टिम लि. यास बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की गोदाम परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज दि. १० च्या सकाळपासून बंद दिसत असल्याने आपले लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सीसीटीव्ही पुरवठा केलेले संपूर्ण देयक आपणास अदा करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी. तसेच यंत्रणा तत्काळ कार्यान्वित न केल्यास काळया यादीत नाव टाकले जाईल. अनामत रक्कम जप्त केली जाईल. याची नोंद घ्यावी. तसेच मतमोजणी होईपर्यंत स्वत: सदर ठिकाणी हजर रहावे. गोदाम सोडून कोठे जायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, तरी जिल्हा मार्केटींग फेडरेशन गोदाम एमआयडीसी सातारा येथील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने योग्य रितीने चालू करण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या . या प्रकारामुळे ईव्हीएम मशीन व सीसीटीव्ही कॅमेरा यांचे काही साठे लोटे आहे का याचीही पोलीस यंत्रणेमार्फत तपासणी करावी अशी मागणी तोंडी स्वरूपात काही उमेदवारांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments