मुंबई : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी सकाळी माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन येथे मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शेवाळे यांनी ओपन जिम मध्ये व्यायाम करत फिट इंडियाचा संदेश दिला. नागरिकांनी उस्फूर्तपणे शेवाळे यांच्याशी संवाद साधत त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
माटुंगा येथील फाईव्ह गार्डन मध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी स्थानिकांसह मोर्निंग वॉक केला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी शेवाळे यांनी उपस्थित रहिवाशांना केले.