Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्र"पहेल" (SRHR) कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे महिला सक्षमीकरण जनजागृती उपक्रम

“पहेल” (SRHR) कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे महिला सक्षमीकरण जनजागृती उपक्रम

धारावी(महेश कवडे ) : “पहेल” (SRHR) कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट या सामाजिक संस्थेतर्फे किशोरवयीन मुली आणि महिलांच्या आरोग्य, स्वच्छता व संरक्षण या विषयावर नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमांतर्गत “मानसिक पाळी” (वयात येणे) लहान वयात येत असल्याने मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, स्वच्छता कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजातील वाढत्या वाईट प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर गुड टच व बॅड टच याचे प्रात्यक्षिकही दाखवून मुलींना जागरूक करण्यात आले.

याशिवाय प्रवासादरम्यान अघटीत घटना घडल्यास सरकारच्या SOS अॅप, 112 व 1090 महिला हेल्पलाइन या आपत्कालीन मदतसेवा यांची माहिती देण्यात आली.

“देवीचे फक्त सौंदर्य नव्हे तर तिच्या हातातील शस्त्रेही पाहावीत, कारण गरज भासल्यास स्त्रीने दुर्गेचे रूप घ्यावे,” असा प्रभावी संदेश संस्थेच्या मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्त्या दीपिका ताई, ज्योती ताई तसेच स्पृहा कवडे व श्रावणी कवडे यांनी दिला.

या जनजागृती मोहिमेत विविध नवरात्री मंडळांमध्ये जाऊन संवाद साधण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments