तापोळा(नितीन गायकवाड) : आपले आरोग्य आपली जबाबदारी” या उपक्रमांतर्गत व कै. अरुण नारायण धनावडे यांच्या स्मरणार्थ रविवार, दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी तापोळा येथे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सव बहुउद्देशीय विकास मंडळ, तापोळा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. त्याच परंपरेत यंदा 105 गावातील सर्वसामान्य जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र, तापोळा व इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड बँक, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून अस्थिरोग तज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. विशेषतः कंबर व गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तारीख: रविवार, 28 सप्टेंबर 2025 वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 स्थळ: पद्मावती मंदिर, तापोळा येथे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. “या पुण्य उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.