कराड(अमोल पाटील) : जिंती तालुका कराड येथील जन्मगाव पण कामोठ्यात असणाऱ्या रहिवासी हर्षल दशरथ पाटील यांनी वाको इंडिया किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन हिमाचल प्रदेश सोलन येथे २२ सप्टेंबर ते २६सप्टेंबर रोजी ज्युनियर मुलं आणि मुलींच्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये २२ राज्यासह ९२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र अध्यक्ष मा.निलेश शेलार सर यांच्या अध्यक्षतेखाली कोच श्री. शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने रायगड मधून चार मुलांनी प्रतिनिधित्व करून श्रवण ठाकूर सिल्वर मेडल, हर्षद पाटील ब्रॉन्झ मेडल, साहिल खान ब्रॉन्झ मेडल, श्रेयश पुकाळे ब्रॉन्झ मेडल मिळविल्याबद्दल रायगड किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन व इंडियन मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे !
हर्षद च्या या कामगिरीमुळे कामोठे सोबतच आपल्या जिंती गावाच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे !