मुंबई : धारावी येथील संत कक्कया मार्ग, नवी चाळ येथे असलेल्या जय भवानी क्रीडा मंडळातर्फे यंदा सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू असून, मंडपात विशेष राजमहल व सुंदरशी भवानी मातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 4 ते 6 “महिलांचे मानसिक आरोग्य व आनंदी जीवनाचा शोध” या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान होणार आहे. दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात कॅन्सरपूर्व निदान तपासणी सर्वांसाठी केली जाणार आहे. दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 5 वा. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त फेस्कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी यांच्या माध्यमातून “ज्येष्ठ नागरिक जनजागृती परिसंवाद” आयोजित करण्यात आला आहे.
या तिन्ही कार्यक्रमांना यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम संयोजिका श्रीमती दीपिका शेरखाने हटकर यांनी ही माहिती दिली. अधिक माहितीसाठी गिरीराज शेरखाने – 9768428550, . गौतम वटकर – 99304770552, दिलीप गाडेकर (सामाजिक कार्यकर्ते) – 9892144065 सर्व कार्यक्रम जय भवानी क्रीडा मंडळासमोर, श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल, संत कक्कया मार्ग, धारावी येथे होणार आहेत.
आयोजकांनी जास्तीत जास्त महिला व ज्येष्ठांनी या सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.