नवी मुंबई : कोपरखैरने वॉर्ड क्र. 38 (नवीन प्रभाग रचना – प्रभाग 11) मधील 30 वर्षे पूर्ण केलेल्या शिवशाही कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ नवरात्र उत्सव समितीतर्फे देवीची आरती व गरबा नृत्याचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शिक्षक सुरेश दादा सालदर, उत्सव समिती अध्यक्ष व भाजपा वॉर्ड अध्यक्ष किशोर दादा पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किशोर दादा पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही देत, “गेली दहा वर्षे महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत, तरीही आमच्या प्रभागातील समस्या आम्ही आदरणीय गणेश नाईक दादांच्या सहकार्याने सोडवत आहोत. महापालिकेचे कर्मचारी कधी कधी अडथळे निर्माण करतात, मात्र लोकांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते,” असे प्रतिपादन केले.