मुंबई(रमेश औताडे) : जीएसटी कमी झाल्याने करोडो भारतीयांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध होणार आहेत. औषधांवरील जीएसटी १२% व १८% वरुन ५% पर्यंत कमी करण्यात आला असून कॅन्सर व जीवनरक्षक बहुतांश औषधी करमुक्त करण्यात आली असल्याने कॅन्सर व जीवनरक्षक औषधामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील १३ लाख औषधी विक्रेत्यांची संघटना अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने ऐतिहासिक जीएसटी निर्णयाचे स्वागत केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महासचिव राजीव सिंगल यांनी रुग्णास याची माहिती व्हावी याकरिता देशातील सर्व दुकांनामध्ये पोस्टर लावण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जुन्या स्टॉकवर मिळणारा जमा परतावा याची उचित व्यवस्था केल्यास व्यापाऱ्यांवर नगदी चलन तुटवड्याचा भार कमी होऊ शकतो. जीएसटी २.० परिवर्तन काळात अनावधानाने काही चुका झाल्यास ३ ते ४ महिन्यापर्यंत औषधी विक्रेत्यास संरक्षण मिळावे. आदी मागण्या सरकारकडे केल्या आहेत.