कराड : राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी कराड येथे महासंघाच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त निबंध लेखन व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे विशेष आभार मानण्यात आले.
लवकरच या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा समारंभ संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष, समाजकल्याण मंत्री मा. बबनराव (नाना) घोलप तसेच प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांच्या शुभहस्ते होणार असून, आयोजनाची जबाबदारी स्वप्निल गायकवाड यांनी स्वीकारली आहे.