मुंबई(महेश कवडे) : छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजताच शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत निषेध नोंदवला.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि माँसाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या सोबत शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, विभागप्रमुख व आमदार महेश सावंत आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी ह्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत समाजात अशा प्रकारची द्वेषपूर्ण कृत्ये थांबवण्याची गरज असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांनीही माँसाहेबांचा गौरव आणि त्यांच्या कार्याची आठवण करून देत अशा कृत्यांविरुद्ध एकजूट राहण्याचे आवाहन केले.
ही घटना समाजाच्या एकतेवर आणि परस्पर सन्मानावर गदा आणणारी असल्याने सर्व स्तरावर निषेध व्यक्त होत आहे.