मुंबई (रमेश औताडे) : कॅप्रि ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ने चार हजार कोटीपर्यंतच्या सुरक्षित, रेटेड, रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स ची सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे. ही विक्री ३० सप्टेंबरपासून सुरू होऊन १४ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक विक्री सुरू आहे.
कंपनीने वर्षिक व्याजदर ८.५५% ते ९.७०% पर्यंत ठरवला आहे. एन सी डी च्या मुदती १८ महिन्यांपासून ते १० वर्षांपर्यंत असतील. बी एस इ लिस्टेड केल्या जातील. कॅप्रि ग्लोबल कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक, राजेश शर्मा यांनी सांगितले की, उभारलेले किमान ७५ टक्के निधी कर्ज परतफेड आणि नवीन कर्ज देण्यासाठी वापरण्यात येईल, तर उर्वरित निधी कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरला जाईल. कंपनीची प्राथमिक सेवा क्षेत्रे एम एस एम इ कर्ज, गोल्ड लोन, हाऊसिंग लोन आणि कन्स्ट्रक्शन फायनान्स आहेत आणि ११,५४६ कर्मचार्यांसह १,१३८ शाखा कार्यरत आहेत.