कराड(प्रताप भणगे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज रेठरे बुद्रुक येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीमती याशनी नागराजन मॅडम (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा), माननीय प्रताप पाटील सर (गटविकास अधिकारी, पंचायत समिती कराड), रेठरे बुद्रुक गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, उमेद बचत गटांचे दोन्ही ग्राम संघांचे पदाधिकारी, तसेच महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी आणि गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या दरम्यान गाव नकाशातील
पानंद रस्ते तसेच नवीन पानंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय, रेठरे बुद्रुक गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उद्घाटन समारंभ ऑनलाइन पाहण्यात आला आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामस्थांनी ग्रामविकासासाठी एकत्र येऊन योजनांचा लाभ घेण्याचा संकल्प व्यक्त केला.,