प
नवेल : मानसी सामाजिक शैक्षणिक संस्था संचलित S नॅपकिन बुके यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “नवदुर्गा पुरस्कार सोहळा” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. माता सरस्वती, श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे मंदार पनवेलकर सर, शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील, अनंत धरणेकर, ‘केतकी प्रकाशन’चे चंद्रकांत जाधव, आचार्य विवेक (दादा) संन्याशी तसेच धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धूळप, रमेश संकपाळ सर, विठ्ठल तोरणेबुबा व आयोजक डॉ गोरखनाथ पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संवाद नात्याचा… कविता डॉट कॉम चा प्रयोग क्रमांक ७६ चे सादरीकरण करण्यात आले. प्रसाद माळी, रुद्राक्ष पातारे, माधवी मोतीलिंग, अक्षता गोसावी, जयेश शिंदे व शंकर गोपाळे यांनी सादर केलेल्या कवितांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
सोहळ्यात पनवेल शहरातील १५ शाळा – महाविद्यालयांच्या महिला प्राचार्यांना “नवदुर्गा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, भेटवस्तू, मायेची उबदार शाल व S नॅपकिन बुकेचा समावेश होता.
नवदुर्गा सन्मानितांमध्ये सौ. सुनीता कदम, सौ. स्मिता पनवेलकर, कविता लक्ष्मी, सौ. स्वप्नाली म्हात्रे, सौ. मोहिनी वाघ, सौ. मनीषा जाधव, सौ. अश्विनी देशमुख, सौ. स्नेहल पाटील, सौ. निकिता पाटील, सौ. संध्या मोरे, सौ. शैलेजा धुमाळ, सौ. कल्पना जिरे, सौ. दिपाली संकपाळ, सौ. सुजाता पाटील व सौ. दक्षता म्हात्रे यांचा समावेश होता.
यावेळी उत्तम सूत्रसंचालनाबद्दल नारायण लांडगे पाटील यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच RSP उप महासमादेशक विलास पाटील , मुंबई समादेशक अमोगसिद्ध पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा संस्थेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक डॉ. गोरखनाथ पोळ यांनी मानसी पोळ यांचा आदर्श प्रवास मांडताना सांगितले की, शिक्षण घेत-घेत त्यांनी ३००-४०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देत S नॅपकिन व्यवसाय यशस्वीरीत्या उभारला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश संकपाळ सर यांनी केले तर संस्थेच्या प्रमुख संचालिका मानसी पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानून सोहळ्याची सांगता केली.