प्रतिनिधी : येत्या 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाण्यात शनिवारी, 11 मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटिझन्स फाऊंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असल्याने या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे शक्य आहे.ठाणे महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सोमवार, 20 मे रोजी मतदानाचा दिवस येत असल्याने शनिवार व रविवार व्यतिरिक्त नागरिकांनी मतदान चुकवू नये यासाठी जनजागृती केली जात आहे. या मतदानाच्या स्मरणार्थ शनिवारी 11 मे रोजी ‘धावा आणि मतदान करा’ असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.शनिवारी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव सकाळी साडेसहा वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरून या मिनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवतील. या मॅरेथॉनमध्ये 12 वर्षांवरील, 15 वर्षांखालील, 18 वर्षांखालील, 18 वर्षांवरील गटांची विभागणी करण्यात आली आहे. घाणेकर सभागृहात मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
ठाणे येथे टीएमसी तर्फे मतदान जागृतीसाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन
RELATED ARTICLES