खारघर : सत्याग्रह महाविद्यालय आणि सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय नवी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने ९३ वा “पुणे करार स्मृतिदिनाचे आयोजन बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शांताबाई रामराव सभागृह, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने “पुणे करार : त्याची मूळे आणि फलनिष्पत्ती” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखालील या चर्चासत्राचे उद्घाटन शेकापचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव हे करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हेमंत सुधाकर सामंत, डॉ. प्रीती शर्मा, जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई विभागीय क्षेत्रांतील अध्यापक महाविद्यालयातील छात्र अध्यापकांना या चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्या नेहा राणे, प्राचार्या वनिता सूर्यवंशी यांनी दिली आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील पुणे करार आणि त्यानंतरची पुणे कराराशी बांधिलकी असलेल्या हिंदू समाजाची मोठी जबाबदारी होती आणि आहे. पुणे कराराने भारत सरकार कायदा १९३५ आणि भारताच्या संविधानात पुणे कराराच्या अति आणि शर्थीचे संवर्धन झाले आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने या विषयावर तटस्थ आणि सखोल चर्चा व्हावी या उद्धेशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे असे महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राचे प्रमुख प्रा. सतीश पवार यांनी सांगितले . हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून उपस्थित राहून चर्चासत्रात मते व्यक्त करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.