प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.प्रत्येक उमेदवार आपआपल्या परीने प्रचार करताना दिसत आहे.आज इंडिया महाविकास आघाडी चे उमेदवार अनिल देसाई यांनी शनिवार असल्याने सकाळी सकाळी ५ गार्डन, पारशी कॉलनी, दादर येथे मॉर्निंग वॉल्क साठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या तसेच
माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथे प्रचारादरम्यान कष्टकरी कामगारांच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असण्याचे आश्वासन दिले.त्याचबरोबर
जैन धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतला.