प्रतिनिधी : मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्था कामोठे, नवी मुंबई यांच्या वतीने एस नँपकिन बुकेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त नारायण वसंतराव लांडगे पाटील यांना त्यांची सुत्रसंचलन शैली, साहित्यिक योगदान या प्रित्यर्थ महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट सुत्रसंचालक पुरस्कार मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा RSP चे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सुत्रसंचलकासोबतच लांडगे पाटील हे वक्ता , नाट्यलेखक तथा दिग्दर्शक म्हणून सुपरिचित आहेत.त्यांच्या कौशल्याचा सन्मान करत नवोदितांना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार प्रदान करत असल्याचे डॉ. पोळ यांनी सांगितले. या पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी प्राचार्य रविंद्र पाटील, प्राचार्य मंदार पनवेलकर , समाजसेवक रमेश सकपाळ, पत्रकार भिमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट सुत्रसंचालक पुरस्कार नारायण लांडगे पाटील यांना प्रदान
RELATED ARTICLES